Showing posts with label Gymnasium. Show all posts
Showing posts with label Gymnasium. Show all posts

Tuesday, January 22, 2019

मुंबई स्कूल असोसिएशनने आयोजित केलेल्या जिम्नॅस्टिकस स्पर्धेतील यश

मुंबई स्कूल असोसिएशनने वडाळा येथील भारतीय क्रीडा संकुलामध्ये जिम्नॅस्टिकस स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये आपल्या व्यायामशाळेमध्ये सराव करणाऱ्या मुलींनी खालीलप्रमाणे यश संपादन केले:
  • कु. सारा पवार - ३ सुवर्ण, १ रौप्य
  • कु. अन्विता पटवर्धन - १ रौप्य
  • कु. पूर्वा साळुंखे - १ सुवर्ण
  • कु. अद्विता तळेकर - १ कांस्य
  • कु. वैष्णवी पाटील - १ सुवर्ण, १ कांस्य
  • कु. ईश्वरी शिंग्रे - १ सुवर्ण

Wednesday, December 12, 2018

जिम्नॅस्टिक शिकणाऱ्या मुलांनी मिळवलेले यश

लोकमान्य सेवा संघामध्ये जिम्नॅस्टिक शिकणाऱ्या मुलांनी विविध शालेय स्पर्धांमध्ये यश संपादन केले. त्यांची नावे व त्यांनी मिळवलेली पदके खालीलप्रमाणे:

मेघ रॉय २ सुवर्ण, १ रौप्य
ईश्वरी डोंगरे१ कांस्य
निकिता शिरपेकर१ सुवर्ण
स्वरा जोशी १ सुवर्ण
देवांशी दावडा१ सुवर्ण
जुई माटे१ रौप्य
अद्विता तळेकर१ रौप्य
देवांश चव्हाण १ सुवर्ण
दृक्ष रावरीया१ रौप्य
क्रीशिव मयानी १ सुवर्ण
गंधर्व मयानी १ कांस्य
वेदांत सातोपे१ सुवर्ण
सिद्धांत कदम १ रौप्य
रुद्र सकपाळदोन कांस्य

Monday, June 18, 2018

जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण वर्ग २०१८-१९

खालील मुलांची जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण वर्गामध्ये निवड झाली आहे. कृपया त्यांनी कार्यालयात जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण वर्गाची फी मंगळवार दि. १९ जून व बुधवार दि. २० जून २०१८ या दोन दिवसांत कार्यालयीन वेळात भरावी.
क्रमांकमुली
अनुष्का कोठारे
देवांशी दावडा
स्वरा जोशी
लावण्या मोरबाळे
तनीषा पेंटर
सीया पै
भक्ती काळे
अदिती जाधव
पद्मश्री तळेकर
१० राधीका हळबे
११ किमया मेस्त्री
१२ हिमानी घोलबा
१३ श्रीमयी शेटे
१४ अदि्वता तळेकर
१५ जूई माटे
१६ पुर्वा साळूंखे
१७ मयुरी चाळके
१८ किमया काळे
१९ आर्या कराबडे
२० मोक्षा बलेकर
२१ आर्या पाटील
मुलगे
२२ देवांश चव्हाण
२३ आदित्य चौधरी
२४ सिद्धान्त कदम
२५ धैर्य पाटील
२६ निकुंज हडपीडकर
२७ शौर्य लाड
२८ हर्ष कदम
२९ आर्यन खेडेकर
३० साईश माने
३१ अवनीश डोंगरे
३२ दक्ष रावरीया
३३ जिग्नेश पुजारी
३४ आयुष ठाकुर
३५ क्रीशव मयानी
३६ मेहुल गोरुले
३७ गंधर्व कुंभार

Tuesday, January 23, 2018

Gymnastics स्पर्धेतील यश - १८ जानेवारी २०१८

 गुरुवार दि. १८ जानेवारी २०१८ रोजी घाटले व्हिलेज, चेंबूर येथे gymnstics स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवसेनेचे युवा नेते श्री. आदित्य ठाकरे यांनी आपल्या संस्थेत सराव करत असलेल्या खालील विद्यार्थ्याना सुवर्णपदक देऊन त्यांचे कौतुक केले.
  • कु. मेघ रॉय
  • कु. आकाश धुवाळी
  • कु. सारा पवार
  • कु. अन्विता पटवर्धन

Monday, August 7, 2017

दहीहंडी २०१७

कु. कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेतील मुले सकाळी मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता दहीहंडी साजरी करणार आहेत. त्यांना प्रोत्साहन द्यायला आणि त्यांचे कौतुक करायला आपण सर्वांनी यावे ही विनंती.
स्थळ - स्वा. सावरकर पटांगण, टिळक मंदिर.
वेळ - मंगळवार दि. 15 ऑगस्ट सकाळी 9 वाजता.

Monday, July 3, 2017

पालकांसाठी प्लेग्रुप

संस्थेच्या कु. कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेतर्फे पालकांसाठी 03 जुलैपासून एक प्लेग्रुप आयोजित केला आहे. विटीदांडू, लगोरी, टिक्कर यासारखे जुने खेळ खेळण्यात आपल्याला रस असेल तर आपण ह्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. सोमवार, बुधवार व शुक्रवार - संध्याकाळी 7 ते 8 अशी या उपक्रमाची वेळ आहे. महिन्याची फी रुपये 400 आहे. अधिक माहितीसाठी कृपया श्रीमती मृदुला दातार यांच्याशी 9870226458 वर संपर्क साधा.

Saturday, July 1, 2017

Volleyball प्रशिक्षण २०१७

सोमवार दि. ०३ एप्रिल पासून संस्थेच्या कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेने Volleyball प्रशिक्षण वर्ग चालू केले आहेत. वेळ सोमवार ते शनिवार संध्याकाळी ८ ते ९-३० अशी आहे. १० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा प्रशिक्षण वर्ग आहे.
अधिक माहितीसाठी शाखेचे कार्यवाह श्री. आदित्य कुलकर्णी यांच्याशी ७०४५००९८११ वर संपर्क साधावा.

Tuesday, June 20, 2017

जागतिक योग दिवस - २०१७

कु. कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेतर्फे आज बुधवार २१ जून रोजी जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा झाला. जेष्ठ नागरिकांची योगासनांची प्रात्यक्षिके, सूर्यनमस्कार, अवघड आसनाचे विशेष प्रात्यक्षिक, खुर्चीवरील योगाभ्यास व सर्वात महत्वाचे ' तणावाचे व्यवस्थापन आणि योग ' हे प्रमुख पाहुणे श्री. विनोद जोशी यांचे भाषण यांनी कार्यक्रमाची उंची वाढवली. त्यांनी दिलेल्या सहा सूत्रांच्या अधाराने कोणतीही व्यक्ती तणावाचे व्यवस्थापन करू शकते. वर्तमान काळात जगणे, अनुकंपा, जबाबदारीची जाणीव, उच्च जीवनमूल्ये व अपेक्षा रहित कृती या मुळे माणूस तणाव रहित जीवन जगू शकतो असे ते म्हणाले.

ku. Krishnabai Limaye gymnasium arranged Internatinal Yoga Day on wednesday 21 st June. It was very well received by audience of around 200 people. It was activitiy packed evening . Starting with prayers, Asana demonstration by senior citizens, Surya Namaskar, chair Yoga practices and the highlight of the program was a lecture of chief guest Mr. Vinod Joshi on ' Stress Management and Yoga'. He explained what is stress, why do we take stress and how to understand it as well as how to overcome it. He gave six simple tips to do it. Living in present, empathy, taking responsibility of one's actions and valubased lifestyle to name the few.

Sunday, June 4, 2017

व्यायामशाळा बालविभाग प्रवेश – २०१७

संस्थेच्या कु. कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेची प्रवेश प्रक्रिया दि. ०२ जूनपासून सुरु झाली आहे. बालाविभागाच्या व्यायामशाळेची वेळ संध्याकाळी ६-१५ ते ७-४५ असून त्यात सूर्यनमस्कार, योग, डंबेल्स,लेझीम,मल्लखांब,खेळ,इ.प्रकार घेतले जातात. व्यायामशाळेची वार्षिक फी रुपये ५,००० / – आहे.

जिम्नॅस्टिक्स साठीची प्रवेश परीक्षा दिनांक 0७ जून रोजी संध्याकाळी ६.वाजता आहे. जिम्नॅस्टिक्सची वार्षिक फी रुपये ८५००/- आहे.

व्हॉलीबॉलची पुढील batch दि. १५ जून पासून सुरु होणार आहे. आठवडयातून ३ दिवस – सोमवार,बुधवार व शुक्रवार संध्याकाळी ७:०० ते ९:३० अशी व्हॉलीबॉलची वेळ असेल. व्हॉलीबॉलची मासिक फी रुपये १००० आहे. तीन महिन्यांची फी, रुपये ३०००/- एकदम भरायची आहे.