Saturday, February 26, 2022

Wednesday, June 5, 2019

Shareholders' e-Voting



Lokmanya Seva Sangh Parle, National Institute of Securities Management(NISM) and Central Depository Services Ltd (CDSL-IPF) invites you for a seminar on shareholders' e-Voting. Dr V.R. Narasimhan will present this topic.

It is scheduled on Saturday 08 June 2019 between 5.30 pm and 7.30 pm. Venue is Gokhale hall, Tilak Mandir, Vile Parle (East).

Some of the benefits of e-Voting are:
  • Enhance share holder participation
  • You can vote on resolutions of all companies held in your demat account with same login details
  • You get ample time to vote
  • Your vote is precious and will help in improving corporate governance standards in India
  • Transparent and Faster process
Program is open to all and it is free of charge.

Tuesday, June 4, 2019

लोकमान्य वार्ता - फेब्रुवारी, मार्च २०१९

लोकमान्य वार्ताचा डिजिटल अंक यावेळेस आम्ही फेब्रुवारी व मार्च अशा दोन महिन्यांचा प्रकाशित करत आहोत. ह्या आधीचे अंक तिमाही प्रकाशित केले होते. पुढील अंक पुन्हा तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित करू. त्यावेळी प्रकाशन काळ हा आर्थिक वर्षाच्या तिमाहीस सुसंगत असेल.

अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करावे. (file size 13 MB).

Saturday, June 1, 2019

ग्राहकपेठ २०१९ - स्टॉलसाठी अर्ज

संस्थेच्या वतीने शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर २०१९ ते रविवार दि. २० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत ग्राहकपेठ आयोजित केली जाणार आहे. आपल्याला जर या ग्राहकपेठेमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज करावा लागेल. अर्जाची प्रत download करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला अर्ज संघ कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये रविवार दि. ३० जून २०१९ पर्यंत स्वीकारला जाईल.

गाळा धारकांच्या मुलाखती शनिवार दि. ०३ ऑगस्ट २०१९ व रविवार दि. ०४ ऑगस्ट रोजी आयोजित केल्या आहेत.

Thursday, May 30, 2019

खासदार श्रीमती पूनम महाजन यांचा जाहीर सत्कार

संस्थेतर्फे स्थानिक खासदार श्रीमती पूनम महाजन यांचा जाहीर सत्कार शनिवार दि. ०१ जून २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजता संस्थेच्या स्वा. सावरकर पटांगणावर आयोजित केला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. स्नेहलता देशमुख असतील. तसेच श्री. पराग अळवणी, श्री. मुकुंद चितळे, श्री. सुनील मोने, श्री. मृगांक परांजपे व श्री. मिलिंद करमरकर हे मान्यवर कार्यक्रमास उपस्थित असतील.

श्रीमती पूनम महाजन 'मोदी सरकार २.० – खासदाराच्या नजरेतून' या विषयावर आपली मते मांडतील.

तरी आपण या सत्कारास उपस्थित रहावे ही विनंती.

Monday, May 20, 2019

९६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

लोकमान्य सेवा संघाची ९६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ०९ जून २०१९ रोजी दुपारी ३.३० वाजता संस्थेच्या पु. ल. देशपांडे सभागृहात भरणार आहे. सभेत पुढील कामे होतील:
  1. रविवार दि. १७ जून २०१८ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून संमत करणे.
  2. रविवार दि. ०७ ऑक्टोबर  २०१८ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून संमत करणे.
  3. कार्यकारी मंडळाने सादर केलेल्या ०१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षाचा वार्षिक वृत्तान्त संमत करणे.
  4. कार्यकारी मंडळाने सादर केलेले हिशेब व हिशेब तपासनिसांनी तपासलेल्या ०१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षाच्या हिशेबास मान्यता देणे.सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणाऱ्या हिशेबाची प्रत वाचण्यास येथे क्लिक करावे.
  5. ०१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या वर्षाचा अर्थ संकल्प संमत करणे.
  6. संघ नियम क्रमांक १८(२) (ज) प्रमाणे पुढील वर्षाकरिता सनदी हिशेब तपासनीस नेमणे व त्यांचे मानवेतन ठरवणे.
  7. संघ नियम क्रमांक १८(२) (झ) प्रमाणे पुढील तीन वर्षांकरता कायद्याचे सल्लागार नेमणे.
  8. संघ नियम क्रमांक १३ (२) (अ) प्रमाणे पुढील तीन वर्षांकरता संघाच्या दोन संयुक्त कार्यवाहांची निवड करणे. (निवडणूक नियमावलीप्रमाणे)
  9. संघ नियम क्रमांक १३ (२) (ब) प्रमाणे पुढील तीन वर्षांकरता कार्यकारी मंडळावरील बारा सभासदांची निवड करणे. (निवडणूक नियमावलीप्रमाणे)
  10. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळचे विषय

सभेची पूर्ण नोटीस वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.


संघ कार्यवाह,
लोकमान्य सेवा संघ, पारले