Monday, May 20, 2019

९६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

लोकमान्य सेवा संघाची ९६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ०९ जून २०१९ रोजी दुपारी ३.३० वाजता संस्थेच्या पु. ल. देशपांडे सभागृहात भरणार आहे. सभेत पुढील कामे होतील:
  1. रविवार दि. १७ जून २०१८ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून संमत करणे.
  2. रविवार दि. ०७ ऑक्टोबर  २०१८ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून संमत करणे.
  3. कार्यकारी मंडळाने सादर केलेल्या ०१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षाचा वार्षिक वृत्तान्त संमत करणे.
  4. कार्यकारी मंडळाने सादर केलेले हिशेब व हिशेब तपासनिसांनी तपासलेल्या ०१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षाच्या हिशेबास मान्यता देणे.सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणाऱ्या हिशेबाची प्रत वाचण्यास येथे क्लिक करावे.
  5. ०१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या वर्षाचा अर्थ संकल्प संमत करणे.
  6. संघ नियम क्रमांक १८(२) (ज) प्रमाणे पुढील वर्षाकरिता सनदी हिशेब तपासनीस नेमणे व त्यांचे मानवेतन ठरवणे.
  7. संघ नियम क्रमांक १८(२) (झ) प्रमाणे पुढील तीन वर्षांकरता कायद्याचे सल्लागार नेमणे.
  8. संघ नियम क्रमांक १३ (२) (अ) प्रमाणे पुढील तीन वर्षांकरता संघाच्या दोन संयुक्त कार्यवाहांची निवड करणे. (निवडणूक नियमावलीप्रमाणे)
  9. संघ नियम क्रमांक १३ (२) (ब) प्रमाणे पुढील तीन वर्षांकरता कार्यकारी मंडळावरील बारा सभासदांची निवड करणे. (निवडणूक नियमावलीप्रमाणे)
  10. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळचे विषय

सभेची पूर्ण नोटीस वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.


संघ कार्यवाह,
लोकमान्य सेवा संघ, पारले 
Posted in:

0 comments:

Post a Comment