Saturday, August 26, 2017

मधुमेहावर नियंत्रण (विना-औषध उपचार पद्धती)

‘डॉक्टर आपुला सांगाती’ या कार्यक्रमात महिन्यातून एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. नामवंत व निष्णात वैद्यकीय तज्ञांचे मार्गदर्शन आणि त्याच बरोबर दिलखुलास गप्पा असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात. आधुनिक विज्ञानाचे शोध आणि त्याचा जनसामान्यांना होणारा उपयोग अशा धर्तीवर बहुमोल विचार या कार्यक्रमांतर्गत मांडले जातात. श्रोत्यांच्या व सर्व समावेशक सामान्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि वैद्यकीय विषयांची योग्य माहिती समाजाला व्हावी हाच या मागचा हेतू.

या महिन्यात आम्ही ‘मधुमेहावर नियंत्रण (विना-औषध उपचार पद्धती)’ या विषयावर व्याख्यान, स्लाइड शो व योगासनांची प्रात्यक्षिके असा कार्यक्राम आयोजित केला आहे. या अंतर्गत तज्ञ डाॅक्टरांशी थेट प्रश्नोत्तरे व संवाद सुद्धा साधता येईल.

मधुमेह तज्ञ – डॉ. अनुश्री मेहेता
स्थळ – गोखले सभागृह, टिळक मंदिर
रविवार दि. १० सप्टेंबर २०१७, संध्याकाळी ५.०० वाजता